सोलापूर-गुन्हे शाखेने शनिवारी सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दी मधील दोन गावठी दारूच्या भट्ट्या उधवस्त केल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 1 लाख 61 हजार रुपयांचा गूळ मिश्रित रसायन साठा व डुप्लिकेट दारू जप्त केली आहे. गुन्हे शाखेने विनोद भगवान चव्हाण (वय३२ वर्ष राहणार भोजप्पा तांडा तालुका उत्तर सोलापूर), मोतीलाल हरिश्चंद्र चव्हाण (वय ४६ वर्ष भोजप्पा तांडा) या दोघा संशयित आरोपींना अटक करून सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी गुन्हे शाखेकडून सलगर वस्ती पोलीस स्टेशन हद्दी मधील भोजप्पा तांडा डोणगाव रोड, एमएसईबी सबस्टेशन च्या पाठीमागील बाजूस हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या फोन भट्ट्यांवर कारवाई झाली. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विनोद चव्हाण हा हातभट्टी दारू तयार करत असताना आढळला. त्याच्याकडून लोखंडी बॅरेल व जमिनीत अर्धवट पुरलेले प्लॅस्टिकचे बॅरेल, असे एकूण सात बॅरेल मधील प्रत्येकी दोनशे लिटर प्रमाणे १४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे गुळ मिश्रित रसायन,एका रबरी टूब मध्ये तयार केलेली ३० लिटर हातभट्टी दारू,तसेच मँकडॉवेल नंबर वन विस्की १८० मिली च्या एकूण २५ सीलबंद काचेच्या बाटल्या असा मुद्देमाल विनोद चव्हाण याच्याकडे मिळून आला. पोलिसांनी सर्व साठा जप्त करून, गावठी दारू तयार करणारी भट्टी उध्वस्त केली. या कारवाई मध्ये एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला.