सोलापूर - शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) दरम्यान मॅचवर पैज लावण्यासाठी लोकांना अधिक रकमेचे आमिष दाखवून लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सोलापूर व गुलबर्गा असे कनेक्शन उघडकीस आणले आहे. यामध्ये सहा संशयित सट्टाबाजी करणाऱ्याना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 38 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅचमुळे सट्टा बाजाराला उधाण आले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक असे दोन राज्यातील सोलापूर व गुलबर्गा या शहरात हा सट्टाबाजार चालत होता. या सट्टाबाजांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेतन रामचंद्र वन्नाल (वय 26 वर्ष, रा. गांधीनगर झोपडपट्टी नं. 3), विघ्नेश नागनाथ गाजूल (वय 24 वर्ष रा. भद्रावती पेठ), राजेश कुरापाटी (रा. अशोक चौक), अतुल सुरेश शिरशेट्टी (रा. अवंतीनगर), प्रदीप मल्लय्या कारंजे (रा. भवानी पेठ), भीमाशंकर सुपेकर (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा -डहाणूत आयपीएल सामान्यावर सट्टा लावणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई; एकाला अटक