महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर काँग्रेसकडून चौथा वर्ष श्राद्ध घालून नोटबंदीचा काळा दिवस साजरा - Congress corporator Vinod Bhosale

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे ५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटबंदीमुळे देशात ५० दिवस हाहाकार माजला होता. कारण नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँकांच्या चकरा माराव्या लागल्या. यात नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागला. त्यामुळे, मोदी सरकारच्या या निर्णयाचा युवक काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

Solapur Congress denomination shraddha
सोलापूर काँग्रेसकडून नोटबंदीचा विरोध

By

Published : Nov 8, 2020, 10:49 PM IST

सोलापूर- शहर काँग्रेसच्या वतीने आज चौथा वर्ष श्राद्ध घालून नोटबंदीचा काळा दिवस पाळण्यात आला, तसेच केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. नोटबंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. अनेक उद्योग बुडाले, अशा घोषणाही देण्यात आल्या.

माहिती देताना काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे ५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटबंदीमुळे देशात ५० दिवस हाहाकार माजला होता. कारण नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँकांच्या चकरा माराव्या लागल्या. यात नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागला. त्यामुळे, मोदी सरकारच्या या निर्णयाचा युवक काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

अचानकपणे तुघलकी निर्णय घेण्यात आला. गोरगरीब जनतेला आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी, दवाखान्यासाठी व आवश्यक कामांसाठी जमा केलेला पैसा काढण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे राहावे लागले. या रांगेत कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला. नोटबंदीच्या निर्णयामुळे लघू उद्योग बुडाले. यामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. या सर्व बाबींचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे सांगत नरेंद्र मोदींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी केली.

यावेळी बँकांच्या रांगेत उभे राहून मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. या प्रसंगी आंबदास करगुळे, विनोद भोसले, तिरुपती परकीपडला, विवेक खन्ना, सैफन शेख, राहुल वर्धा, डॉ. अरमान पटेल, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा-सोलापूर : कोरोना महामारीमुळे बंद असलेले रेल्वे आरक्षण केंद्र सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details