सोलापूर - लॉकडाऊनमुळे अडकलेले स्थलांतरित मजूर, निराधार आणि गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याची गरज आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि उद्योजकांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांना जिल्हाधिकाऱ्यांचे मदतीसाठी आवाहन - कोरोना सोलापूर बातम्या
लॉक डाऊनमुळे इतर जिल्ह्यातील तसेच पर राज्यातील अडकलेले मजूर आणि निराधार लोकांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मदतीचे आवाहन केले.
लॉक डाऊनमुळे इतर जिल्ह्यातील तसेच पर राज्यातील अडकलेले मजूर आणि निराधार लोकांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी हे आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात काल रात्री झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, अडकलेल्या लोकांसाठी 'कम्युनिटी किचन' सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यासाठी धान्य आणि अनुषांगिक साहित्याची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाला यासाठी मदत करण्यात यावी. अन्नधान्य देणाऱ्या इच्छुकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील (982290907), उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे (9960600975), शैलेश सुर्यवंशी (7588327994) यांच्याशी संपर्क साधावा.