सोलापूर - जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्यावतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. शहरातील पार्क चौक येथे शुक्रवारी सकाळी हे आंदोलन झाले.
तेजस्वी सूर्यांच्या पदयात्रेवर हल्ला; सोलापूर भाजपाकडून निषेध - bjym solapur latest news
सोलापूर येथे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस सागर अतनुरे, संदीप जाधव आदी. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर भाजयुमो आंदोलन
भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांच्या पदयात्रेवर कोलकाता येथे तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून रॉकेल बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. तसेच अश्रू धुराचाही वापर करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी संघटन सरचिटणीस सागर अतनुरे, संदीप जाधव, अक्षय अंजिखाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated : Oct 9, 2020, 3:29 PM IST