सोलापूर -जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. त्यामुळे सोलापूर भाजपच्या वतीने शहरातील सिव्हील हॉस्पीटल चौकातील कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सोलापूर भाजपकडून कलम ३७० रद्दच्या निर्यणाचे स्वागत; पेढे वाटून आनंदोत्सव साजरा - सोलापूर भाजप
गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मिर राज्याला लागू असलेले कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, आता भाजपने त्यांचे आश्वासन पूर्ण केले असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले.
सोलापूर भाजपकडून कलम ३७० रद्दच्या निर्यणाचे स्वागत; पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेले कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, आता भाजपने त्यांचे आश्वासन पूर्ण केले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातील लोकांना एकच कायदा लागू होणार आहे. त्यामुळे अखंड आणि एकसंघ भारताचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी व्यक्त केली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.