महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP Leader Resigned : बेडरूममधील महिलेसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा - सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हनी ट्रॅप

7 जुलै रोजी सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेविरोधात आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ( Solapur BJP district president Shrikant Deshmukh resigned )

Shrikant Deshmukh resigned
भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांचा राजीनामा

By

Published : Jul 12, 2022, 7:30 PM IST

Updated : Jul 12, 2022, 7:45 PM IST

सोलापूर -हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे सोलापूर ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ( Solapur BJP district president Shrikant Deshmukh resigned ) आहे. हा राजीनामा मंगळवारी 12 जुलै रोजी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारला. भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांकडे जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करत एका महिलेने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजप गटात मोठी खळबळ उडाली आहे.

बेडरूममधील महिलेसोबतचा व्हायरल व्हिडिओ

हनी ट्रॅपची तक्रार ओशिवारा पोलीस ठाण्यात दाखल -7 जुलै रोजी सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेविरोधात आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांचा राजीनामा

शहर अध्यक्षांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी -भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणे पसंत केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

हेही वाचा -Breaking News : स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले

Last Updated : Jul 12, 2022, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details