महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर विमानतळावरील गवताला लागलेली आग आटोक्यात - सोलापूर विमानतळ आग

शहरातील होटगी रोडवरील विमानतळ सध्या बंद अवस्थेत आहे. याठिकाणी फक्त खासगी विमाने उतरतात. त्यामुळे या विमानतळाकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. परिणामी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. सोमवारी अचानक या विमानतळावरील गवताला आग लागली.

solapur airport fire
सोलापूर विमानतळावरील गवताला लागलेली आग आटोक्यात

By

Published : Feb 4, 2020, 8:19 AM IST

सोलापूर -शहरातील विमानतळावरील वाळलेल्या गवताला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सोलापूर विमानतळावरील गवताला लागलेली आग आटोक्यात

शहरातील होटगी रोडवरील विमानतळ सध्या बंद अवस्थेत आहे. याठिकाणी फक्त खासगी विमाने उतरतात. त्यामुळे या विमानतळाकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. परिणामी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. सोमवारी अचानक या विमानतळावरील गवताला आग लागली. परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर अग्नीशमन दलाने सात गाड्या पाण्याचा वापर करत ही आग आटोक्यात आणली. कोणीतरी आगपेटी टाकून ही आग लावली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details