सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदार संघात चूरशीची लढत होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सोलापुरातील निवडणूक तिरंगी होत आहे. या तिरंगी लढतीत कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकूमार शिंदे यांना कोणताही दगा-फटका होऊ नये, यासाठी खूद्द शरद पवार हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घडामोड आणि हालचाल दररोज कळविण्याच्या सूचना खू्द्द शरद पवारांनी केल्या आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकूमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात दोन सभा घेतल्या तसेच सोलापुरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी-गाठीदेखील घेतल्या. सुशीलकूमार शिंदे यांची सोलापुरातील सीट डेंजर झोनमध्ये आहे. वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे मागासवर्गीय समाज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे उभा राहिल्याचे चित्र सध्या सोलापुरात पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुशीलकूमार शिंदे यांच्यासाठी शरद पवार हे धावून आले आहेत. त्यासाठी पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांनादेखील कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येकांची व्यक्तीगत भेट घेऊन प्रत्येकाला शरद पवारांनी वेळ दिला आणि कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
राष्ट्रवादी भवनात पार पडल्या भेटी-गाठी-