पंढरपूर :कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा चेहरामोहरा बदलला आहे. बहुतांश मंडळांनी सामाजिक दायित्वातून आरोग्यासंबंधित कार्यक्रमांचा सपाटा लावल्याचे दिसत आहे. पंढरपुरातील गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळानी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. पंढरपूर शहरातील सहकार गणेश उत्सव मंडळ व श्री समर्थ रामदास तालीम मंडळाकडून अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिरासारखा उपक्रम राबवण्यात आला आहे. मंडळांनी आरोग्योत्सवासोबतच पुन्हा एकदा सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली आहे.
समर्थ रामदास तालीम मंडळाची रक्तदानातून सामाजिक भान
राज्यात गणेश उत्सवानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम मंडळांकडून राबवले जातात. मात्र सध्या कोरोना पार्श्वभूमीवर गणेश उत्सव हा साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. पंढरपुरातील श्री समर्थ रामदास तालीम मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालीम मंडळाकडून उपक्रमावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, रक्तदान शिबिरात 351 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आहे. तालीम मंडळाकडून कोरोना योद्ध्यांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात मंडळाकडून समाजोपयोगी कामे केली आहेत. सुमारे 81 वर्षाची परंपरा असलेले श्री समर्थ रामदास तालीम मंडळ आहे.