महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊतांच्या गाडीवर चप्पल भिरकावली, नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा - नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा

Sanjay Raut : सोलापुरात संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कालच भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना ताजी असतानाच राऊत यांच्यावर चप्पल फेकल्याचा प्रकार घडला आहे.

Sanjay Rauts
Sanjay Rauts

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 9:03 PM IST

Updated : Dec 11, 2023, 10:10 AM IST

सोलापूरSanjay Raut : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञातानं चप्पल फेकल्याची घटना घडली आहे. संजय राऊत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोलापुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत शिवसैनिकांशी संवाद साधला. संध्याकाळी राऊत यांच्या हस्ते एका हॉटेलचं उद्घाटन झालं. त्यानंतर संजय राऊत शहरात परतत असताना बाळे उड्डाणपुलावरून काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर चप्पल फेकली. यावेळी चप्पल फेकणाऱ्यांनं नारायण राणे जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना देखील संजय राऊत यांच्यावर चप्पल फेकण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

अज्ञाताचं घटनास्थळावरुन पलायन : दिवसभरातील कार्यक्रम संपल्यावर राऊत यांच्या हस्ते सोवळे बाळे येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या भवर यांच्या हॉटेलचं उद्घाटन झालं. यावेळी कार्यक्रमाला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. बाळे येथील उद्घाटन आटोपून राऊत सोलापुरातून बाहेर पडत होते. त्यावेळी उड्डानपुलावरुन राऊत यांच्या गाडीवर एकानं चप्पल भिरकावली. त्यानंतर अज्ञातानं घटनास्थळावरुन पलायन केलं. चप्पल फेकणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप :2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपा बॉम्बस्फोट करणार असल्याची भीती खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्याशिवाय भाजपा निवडणूक जिंकू शकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपा उत्तर प्रदेशसह उत्तर भारतीय राज्यांमध्ये मार्केटिंग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारतातील बेरोजगारीच्या समस्येवर भाजपा काहीच बोलत नाही. भाजपाचं हे राजकारण किती दिवस चालणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. शरद पवारांचे खरे राजकीय वारसदार अजित पवारचं - उदयकुमार आहेर
  2. ..अन्यथा गाठ मराठ्यांशी; नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा
  3. देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी
Last Updated : Dec 11, 2023, 10:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details