महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर तालुक्यात 3 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित - पंढरपूर कोरोना बातमी

पंढरपूर शहरातील अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक तसेच शिवाजी चौक ते अर्बन बँक या सीमा क्षेत्रातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Pandharpur City Police
पंढरपूर शहर पोलीस

By

Published : May 28, 2020, 7:10 PM IST

सोलापूर- पंढरपूर तालुक्यात आतापर्यंत 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात कोणालाही प्रवेश करता येणार नाही तसेच या क्षेत्रातून कोणालाही बाहेर पडता येणार नाही, असे आदेश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.

पंढरपूर तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी 5 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पंढरपूर तालुक्यातील ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्या भागात नव्याने 3 ठिकाणचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील 2 कोरोनाबाधित रुग्णांना वाखरी येथील एमआयटी कॉलेजमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. शहरातील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी भागातील नागरिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने सदर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

शहरातील अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक तसेच शिवाजी चौक ते अर्बन बँक या सीमा क्षेत्रातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागातील रुग्णालये, औषध दुकाने व दुध विक्री केंद्रे वगळता इतर सेवा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील संस्थात्मक विलगीकरण करणात असलेला नागरिक कोरोनाबाधित आढल्याने गोपाळपूर गावठाण परिसर केंद्रस्थानी धरून त्यापुढील 3 किलोमीटर परिसरातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच 7 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर मौजे करंकब येथेही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने करकंब गावठाण केंद्रस्थानी धरुन त्या पुढील 3 किलोमीटरचा परिसरातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच 7 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी आदेशात नमूद केले आहे.

तालुक्यात घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, घराच्या बाहेर पडू नये. जेणेकरुन आपल्यामुळे दुसऱ्या नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन करु नये. रेड झोन मधून आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाईनचे योग्य पालन करावे तसेच बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची शेजाऱ्यांनी त्वरीत माहिती प्रशासनास द्यावी, असे आवाहनही प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details