सोलापूर- सिद्धेश्वरांच्या यात्रेतल्या पारंपारिक भाकणुकीत राजकीय, सामाजिक, नैसर्गिक, महागाई, आर्थिक चढ उतार या बाबतीत यंदाची परिस्थिती स्थिर राहील तसेच पाऊस साधारण स्वरुपाचा पडेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेत भाकणूक हेही वाचा-राजेंना कोणी पुरावे मागत असतील तर त्यांनी ते द्यावेत - नवाब मलिक
होम प्रदीपन सोहळा झाल्यानंतर नंदीध्वजांच्या उपस्थितीत भाकणुकीच्या वासराची पूजा करण्यात आली. सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मानकरी देशमुख यांच्या घरातील गाईचे वासरू भगिनी समाजाजवळ आणण्यात आले. या वासराला दिवसभर पाणी, चारा न देता उपाशी ठेवण्यात येते. त्यानंतर वासरासमोर धान्य, फळे ठेवण्यात येतात. वासरू ज्या वस्तूला स्पर्श करेल ती वस्तू महाग होईल, असे भाकीत केले जाते. यावरून पुढील वर्षाचे राजकीय भाकीतही केले जाते. यावेळी मानकरी देशमुख यांनी भाकीत वर्तविले.
गेल्या वर्षासारखीच परिस्थिती स्थिर राहील. वासराने समोर ठेवलेल्या वस्तूला स्पर्श केला नाही. त्यावरून अन्न-धान्याच्या किंमती या जैसे थे राहतील. देशातील राजकीय परिस्तिथी स्थिर राहील, असे भाकीत राजशेखर हिरेहब्बू यांनी वर्तविले. वासराने मलमूत्र विसर्जन केले नाही. त्यामुळे मागच्या वर्षासारखीच पावसाची स्थिती राहील, असे भाकीत वर्तविले. सरतेशेवटी आगीची मशाल वासरासमोर धरली असता, ते स्तब्ध राहिले यावरून यावर्षी कशाचीही भीती राहणार नाही, असा आडाखा लावण्यात आला. सोलापूरसह शेजारील जिल्ह्यात आजही सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक शेतकरी वर्गात महत्वाची मानली जाते.