महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ - सोलापूर नंदीध्वज पूजन न्यूज

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात मंगळवारी तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. यंदाच्या वर्षी यात्रेवर कोरोना संसर्गाचे सावट दिसून आले. प्रशासनाच्या आदेशानुसार मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्याला यावेळी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

सोलापूर सिद्धेश्वर महायात्रा न्यूज
सोलापूर सिद्धेश्वर महायात्रा न्यूज

By

Published : Jan 12, 2021, 2:56 PM IST

सोलापूर - भक्तलिंग हरहर...! बोला हरहर..! सिद्धेश्वर महाराज की जय....! या जयघोषात उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वर महाराजांच्या महायात्रेला सुरुवात झाली आहे. वीरतपस्वी होटगी मठाचे मठाधिपती मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या नंदीध्वजांची आणि पालखीची पूजा करण्यात येऊन तैलाभिषेकासाठी मानकरी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात मार्गस्थ झाले.

नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ
नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ
नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ

तैलाभिषेक करत महायात्रा सुरू

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात मंगळवारी तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. यंदाच्या वर्षी यात्रेवर कोरोना संसर्गाचे सावट दिसून आले. प्रशासनाच्या आदेशानुसार मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्याला यावेळी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

हेही वाचा -भांडणानंतर घरातून निघून आली पश्चिम बंगालची तरुणी, आईवडिलांचा शोध घेत दिले ताब्यात

हिरेहब्बू वाड्याला पोलीस छावणीचे स्वरूप

हिरेहब्बू यांच्या वाड्याकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते.तसेच भाविकांची वर्दळ वाढू नये म्हणून याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी दहा वाजता उत्तर कसब्यातील यात्रा प्रमुख हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून या तैलाभिषेक मिरवणुकीला सुरुवात झाली.पोलिसांनी कोरोना महामरीच्या पार्श्वभूमीवर गर्दी होता कामा नये, यासाठी विशेष काळजी घेत कोणासही प्रवेश दिला नाही.

नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ
नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ

यांच्या हस्ते झाले पालखी पूजन

प्रमुख मान्यवर म्हणून वीरतपस्वी होटगी मठाचे मठाधिपती डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी तसेच मानकरी राजशेखर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू सागर हिरेहब्बू शिवानंद हिरेहब्बू आणि जगदीश हिरेहब्बू माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींच्या हस्ते सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन झाले. तसेच मानाचे पहिल्या आणि दुसर्‍या नंदीध्वजाचे पूजन यावेळी मोठ्या मंगलमय वातावरणात आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर आरती करून करण्यात आले.

नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ
पायी जाणारी यात्रा मानकरी गाड्यामध्ये

तदनंतर कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांना बग्गी मध्ये बसवण्यात आले होते. वाड्यातून पालखी मार्गस्थ झाल्यानंतर श्रींची पालखी विशिष्ट प्रकारच्या रथामध्ये विराजित करण्यात आली. त्यास आकर्षक आणि सुवासिक फुलांची आरास साकारण्यात आली होती. यावेळी सिद्धेश्वर भक्तांची पालखीचे दर्शन घेण्यासाठी एकच मांदियाळी होती.आबालवृद्ध भक्त श्रींच्या दर्शनासाठी आसुसलेले होते. पारंपारिक पोशाख परिधान करत चिमुकल्यांनी आपल्या हाती नंदीध्वज धरला होता. परंतु यावर्षी नंदीध्वज मिरवणूक नसल्याने भाविकांमध्ये म्हणावा तसा उत्साह दिसून आला नाही.प्रमुख मानकरी तसेच नंदीध्वजधारकांना गाड्यांमध्ये बसवण्यात आले होते. पायी जाणारी यात्रा यावर्षी कोरोनामुळे गाड्यांमध्ये काढण्यात आल्याचे दिसून आले

हेही वाचा -धक्कादायक; नाशिकमध्ये रस्त्याच्या कडेला आढळले अवघे तीन महिन्यांचे बाळ

ABOUT THE AUTHOR

...view details