सोलापूर- महानगरपालिकेच्या महापौराची आज निवडणूक झाली. यात भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची महापौर पदासाठी निवड झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
सोलापूरच्या महापौरपदी श्रीकांचना यन्नम, शिवसेना-काँग्रेसकडून माघार - सोलापूर महापौर
महानगरपालिकेच्या महापौराची आज निवडणूक झाली. यात भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची महापौर पदासाठी निवड झाली. काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
सोलापूर महापौरपदी श्रीकांचना यन्नम
यानंतर भाजप आणि एमआयएमचे उमेदवार रिंगणात होते. श्रीकांचना यन्नम यांना 51 मते मिळाली. तर एमआयएमच्या शहाजीदाबानो शेख यांना 8 मते मिळाली. यामुळे सोलापुरच्या महापौरपदी श्रीकांचना यन्नम यांची निवड झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, शिवसेना, माकप आणि वंचितच्या नगरसेवकांनी महापौरपदासाठी मतदान न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने 39 मते तटस्थ होती.