सोलापूर- सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम, तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची निवड झाली आहे. यन्नम यांना 51 मते पडली तर त्यांच्या विरोधातील एमआयएमच्या शहाजीदाबानो शेख यांना अवघे 8 मते पडली. तर भाजपच्याच राजेश काळे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यांना 50 मते पडले. तर काँग्रेसच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार फिरदोस पटेल यांना 34 मते मिळाली.
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या श्रीकांचना यन्नम या 43 मतांनी विजयी झाले. तर उपमहापौरपदी भाजपचे राजेश काळे हे 16 मतांनी विजयी झाले आहेत. यन्नम यांच्याविरोधात एमआयएम पक्षाच्या शहाजीदाबानो शेख यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एमआयएमच्या शहाजीदाबानो शेख यांना 8 मते पडली तर श्रीकांचना यन्नम यांना 51 मते पडली.
महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या एकूण 39 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे एमआयएम आणि भाजप या दोन पक्षातील उमेदवारांमध्येच थेट लढत झाली.
सोलापूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याचे पहायला मिळाले. महापौर पदाच्या निवडीमध्ये 2 विरोधी पक्षाची मत फुटली आहेत. महापौर निवडीनंतर उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी, भाजपचे राजेश काळे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल आणि एमआयएमच्या तस्लीम शेख यांच्यात निवडणूक झाली.
यावेळी शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. तर शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर आणि देवेंद्र कोठे यांनी उपमहापौर पदाच्या मतदानात भाग घेतला नाही. उपमहापौरपदासाठी भाजपचे राजेश काळे यांना 50 तर फिरदोस पटेल यांना 34 मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवार तस्लीम शेख यांनी 8 मते घेतली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे राजेश काळे 16 मतांनी विजयी झाले.
हेही वाचा - सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला