महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर दोन दिवस बंद; पोलिसांची त्रिस्तरीय नाकाबंदी - पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर न्यूज

पंढरपूरला 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान माघी एकादशी सोहळा होणार आहे. मात्र, याकाळात मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असून शहरात संचारबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

Vitthal-Rukmini
विठ्ठल-रुक्मिणी

By

Published : Feb 22, 2021, 11:44 AM IST

सोलापूर(पंढरपूर) - पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा माघी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद असणार आहे. उद्या(२३ फेब्रुवारी)ला एकादशीच्या दिवशी पंढरपुरात संचारबंदी असणार आहे. पोलीस प्रशासनाने पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. फक्त एसटी बस सेवा सुरू राहणार आहे.

विठ्ठल मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद -

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या माघी यात्रेत गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मंदिर समितीकडून विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन 22 ते 23 फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, यादरम्यान पांडुरंगाची नित्यपूजा पार पडणार आहे. 24 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजल्यापासून विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी पंढरपुरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांची त्रिस्तरीय नाकाबंदी -

पंढरीत माघ यात्रेच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीमार्फत आज व उद्या (22 व 23 फेब्रुवारी) श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. शहरासह परिसरातील 10 गावांमध्ये 24 तासांची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. इतर राज्यातून व राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या दिंड्यांना व भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. बाहेरील भाविकांनी मठात थांबू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. तसेच निर्भया पथक व स्वेरी इंजिनियरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने भाविक व नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेगावचे मंदिरही आजपासून बंद -

वाढत्या कोरोनाचा प्रदूर्भाव लक्षात घेता विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेले शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. आजपासून (22 फेब्रुवारी) पुढील आदेशा येईपर्यंत मंदिर पूर्णतः बंद करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला. सध्या जिल्ह्यात संचारबंदी लावली असून, बाजार पेठेतील दुकाने व आस्थापना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details