महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाळवणी : पोलिओ लसीकरणादरम्यान हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - पोलिओ लसीकरणादरम्यान हलगर्जीपणा

एका दीड वर्षाच्या मुलाला पोलिओची लस देताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सूक्ष्म असे प्लास्टिकचे टोपण त्या बाळाच्या पोटात गेले होते. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भाळवणी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

show-cause-notice-to-medical-personnel
show-cause-notice-to-medical-personnel

By

Published : Feb 2, 2021, 7:35 PM IST

Updated : Feb 2, 2021, 7:42 PM IST

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील भाळवणी या गावात 31 जानेवारी रोजी एका दीड वर्षाच्या मुलाला पोलिओची लस देताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सूक्ष्म असे प्लास्टिकचे टोपण त्या बाळाच्या पोटात गेले होते. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भाळवणी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवले आहे. तसेच पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून बालकाची काळजी घेतली जात आहे.

हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
असा झाला होता प्रकार -

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रावर रविवारी लसीकरण मोहीम राबवण्यात येत होती. त्यावेळी माधुरी व बाबा बुरांडे या जोडप्याच्या एक वर्षाच्या मुलाला डोस देण्यासाठी केंद्रावर आणले होते. मुलाला लसीकरण करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एक वर्षाच्या मुलाच्या तोंडात सूक्ष्म प्लॅस्टिकचे टोपण त्याच्या अन्ननलिकेतून पोटात गेले. बुराडे पती-पत्नी बाळाला घेऊन घरी गेल्यानंतर त्या एका वर्षाच्या बाळाला त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते ताडे यांच्या बरोबरीने रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्ष-किरण तपासणी केली असता कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकचे टोपण त्या बाळाच्या पोटात आढळून आले नाही. त्यानंतर बाळाला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ असणार्‍या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ४८ तास ठेवण्यात आले आहे.


पोलिओ लसीकरणा दरम्यान हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आनंद पुरी, भूलतज्ञ अरविंद गिरी, ग्राम वैद्यकीय अधीक्षक व तज्ञांकडून त्या बालकाची तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या बालकाला अठ्ठेचाळीस तासाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. चोवीस तासांमध्ये त्या बालकाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर बालकाचे लसीकरण मोहिमेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Last Updated : Feb 2, 2021, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details