महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिशन पुर्नप्रारंभ अंतर्गत रविवारीही सर्व दुकाने खुली राहणार - सोलापूर लेटेस्ट बातमी

जून महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोलापुरातदेखील अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. 8 जुलैच्या अध्यादेशानुसार नियम व अटीनुसार दुकाने, सलून, दुचाकी वाहनांना सूट देत सोलापूर पूर्वपदावर येत आहे.

मिशन पुर्नप्रारंभ अंतर्गत रविवारीही सर्व दुकाने खुली राहणार
मिशन पुर्नप्रारंभ अंतर्गत रविवारीही सर्व दुकाने खुली राहणार

By

Published : Aug 2, 2020, 2:02 PM IST

सोलापूर -लॉकडाऊननंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे मिशन पुर्नप्रारंभ अंतर्गत रविवारीदेखील सोलापुरातील दुकाने खुली राहतील, अशी माहिती महापालिका उपायुक्त अजयसिंग पवार यांनी दिली. 8 जुलैच्या अध्यादेशात जी नियमावली दिली आहे. त्यानुसार पी-1, पी-2 अंतर्गत दुकाने खुली राहणार आहेत.

मिशन पुर्नप्रारंभ अंतर्गत रविवारीही सर्व दुकाने खुली राहणार

सर्व भारतात लॉकडाऊन झाल्यापासून दुकाने, रस्ते वाहतूक सेवा, रेल्वे सेवा, हवाई सेवा, हॉटेल इंडस्ट्री सर्व ठप्प झाले होते. मात्र, जून महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोलापुरातदेखील अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. 8 जुलैच्या अध्यादेशानुसार नियम आणि अटीनुसार दुकाने, सलून, दुचाकी वाहनांना सूट देत सोलापूर पूर्वपदावर येत आहे.

कोरोना विषाणुची वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने 16 ते 26 जुलै असे दहा दिवस पुन्हा एकदा लॉकडाऊन केले होते. तसेच दहा दिवसांच्या लॉकडाऊन अगोदर आणि नंतर रविवारी सर्व सोलापूर बंद ठेवण्याचा आदेश होता. महापालिकेचे उपायुक्त अजयसिंग पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशन पुर्नप्रारंभ अंतर्गत आता रविवारीही सर्व दुकाने खुली ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये शासनाने दिलेल्या पी-1, पी-2 नियम असणार आहे. तसेच 5 ऑगस्टपासून सोलापुरातील आणि राज्यातील मॉल्स सुरू होतील. यानुसार संपूर्ण आठवडाभर दुकाने खुली राहणार आहेत. यामुळे लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले सोलापूर हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

तर सोलापूर शहराची कोरोना रुग्ण संख्या 5 हजारांच्या पार गेली आहे आणि प्रशासन एकीकडे सर्व सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. बाजारात किंवा दुकानात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर दररोज शंभरहून जास्त रुग्ण आढळत आहेत. यामुळे शासनाचा हा निर्णय कितपत योग्य आहे आणि नागरिक त्याला कशाप्रकारे प्रतिसाद देतात, हे आगामी काळात दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details