महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक : सोलापुरात विष प्राशनकरून वृद्ध दाम्पत्याने संपले जीवन - सोलापुरात वृद्ध दाम्पत्याने संपले जीवन

सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी गावच्या शिवारात मुळे दाम्पत्य शेती करीत होते. काल गुरुवारी सायंकाळी अज्ञात कारणावरून मुळे पती-पत्नी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशीर झाला तरी पुन्हा घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी त्यांना ते शेतातील लिंबाच्या झाडाखाली बेशुद्धावस्थेत आढळून आले.

Shocking: Elderly couple ended their lives by consuming poison in Solapur
धक्कादायक : सोलापुरात विष प्राशनकरून वृद्ध दाम्पत्याने संपले जीवन

By

Published : Oct 9, 2021, 6:03 PM IST

सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावच्या शिवारात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे एका वृध्द शेतकरी दाम्पत्याने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आला आहे. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

किटकनाशक घेऊन केली आत्महत्या -

पोपट बाबुराव मुळे (वय ६५) आणि कमलबाई पोपट मुळे (वय ५७) अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी वृध्द दाम्पत्याची नावे आहेत. खंडाळी गावच्या शिवारात मुळे दाम्पत्य शेती करीत होते. गुरुवारी सायंकाळी अज्ञात कारणावरून मुळे पती-पत्नी घरातून बाहेर पडले. रात्री उशीर झाला तरी पुन्हा घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. रात्रभर शोधूनही मुळे दाम्पत्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी, दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध सुरू झाला असता आपल्याच शेतातील टोमॅटोच्या प्लॉटमध्ये लिंबाच्या झाडाखाली मुळे दाम्पत्य बेशुध्दावस्थेत पडलेले आढळून आले. दोघांच्याही तोंडातून फेस येत होता. त्यांनी कोणते तरी कीटकनाशक प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणाची मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -क्रूरकर्मा बापाची निष्ठुरता कोवळ्या मुलांच्या जीवावर.. दीड महिन्यात 'या' पाच घटनांनी हादरले कोल्हापूर

ABOUT THE AUTHOR

...view details