सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे. साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून अनेकांना वर्षा बंगल्यावर जाण्याची वेळी आणली आहे. ज्यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या सात-बारा वर नाव होते. ते आज पक्ष सोडून जात आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते पंढरपूर येथे शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.
उद्धव ठाकरे गुळाला मुंगळा चिकटून बसल्यासारखे सत्तेला चिटकलेत, खासदार अमोल कोल्हे यांची टीका
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, कर्जमाफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू. पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे बसले आहेत. यांच्या खिशातील राजीनामे भिजून गेले पण यांनी राजीनामे काही दिले नाही, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. ते पंढरपूर येथे शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, कर्जमाफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू. पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे बसले आहेत. यांच्या खिशातील राजीनामे भिजून गेले पण यांनी राजीनामे काही दिले नाही, असे कोल्हे म्हणाले.
Last Updated : Aug 28, 2019, 4:29 PM IST