महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बार्शीत शिवसैनिकांकडून बजाज फायनान्सच्या कार्यालयामध्ये तोडफोड - बार्शी सोलापूर न्यूज

बार्शी शहरात आज (बुधवार) शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह इतर शिवसैनिकानी बजाज फायनान्स या खाजगी कंपनीच्या कार्यालयावर हल्ला करत, तेथील ऑफिसची तोडफोड केली.

shivsena party workers vandalism office of bajaj finance company at barshi
शिवसेनेकडून बार्शीत बजाज फायनन्सच्या कार्यालयाची तोडफोड

By

Published : Jun 10, 2020, 5:01 PM IST

सोलापूर - बार्शी शहरात आज (बुधवार) शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह इतर शिवसैनिकानी बजाज फायनान्स या खाजगी कंपनीच्या कार्यालयावर हल्ला करत, तेथील ऑफिसची तोडफोड केली. अगोदर बजाज फायनान्सकडून वसुलीसाठी देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दल मोर्चा काढण्यात आला होता. तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता, तेथील कर्मचार्‍यांनी महिलांशी बेजबाबदार वर्तन केले असल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले.

त्यामुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित असणाऱ्या इतर कार्यकर्त्यांनी बजाज फायनान्स ऑफिसवर दगडफेक केली. तसेच दर्शनी भागात असणारा बोर्ड आणि काच यावर दगड मारून नुकसान केले. या घटनेबाबत बुधवारी दुपारपर्यंत बार्शी पोलीस ठाण्यांमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. हे आंदोलन बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांचे सहकारी राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

शिवसेनेकडून बार्शीत बजाज फायनन्सच्या कार्यालयाची तोडफोड

हेही वाचा...कार्टून पाहण्यास मज्जाव केल्याने १३ वर्षीय मुलाची आत्महत्या..

बार्शी शहरातील एक महिलेला बजाज फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्यांमार्फत सदर महिलेच्या घरी जाऊन त्रास देण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर त्या महिलेने आपल्या मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने तिने आपले मंगळसूत्र गहाण ठेवले होते, अशीही माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली. यामुळेच आपण याबाबत बजाज फायनान्स या खाजगी फायनान्स कंपनीकडे विचारणा करण्यासाठी गेलो होतो, असे आंधळकर यांनी सांगितले.

'शासनाने आणि आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार नोव्हेंबर महिन्यापर्यंत कर्जवसुली थांबवावी, असे आदेश असताना काही खासगी कंपन्या फायनान्स, बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट अशा संस्थांकडून कर्जवसुली साठी तगादा लावला जात आहे. बार्शी शिवसेना असे कोणतेही प्रकार खपून घेणार नाही. अन्यथा शिवसेना स्टाईलने प्रत्येक वित्तीय संस्थेला उत्तर मिळेल. तेव्हा कर्जवसुली तत्काळ थांबवावी कारण लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाही. अनेक अडचणीत आहेत. रिक्षावाल्यांचे धंदे नाहीत. अशा काळामध्ये जर वसुली झाली तर असेच उत्तर दिले जाईल' असे यावेळी भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details