महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महेश कोठेंवर कोणताही अन्याय नाही, १४ तारखेपर्यंत निर्णय न घेतल्यास कारवाई - शिवाजी सावंत

महेश कोठेंवर कोणताही अन्याय झालेला नसून, शिवसेनेने त्यांना भरपूर काही दिले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा सम्नवयक प्रा. शिवाजी सावंत यांनी दिली.

शिवाजी सावंत, महेश कोठे

By

Published : Oct 11, 2019, 3:25 PM IST

सोलापूर - महेश कोठेंवर कोणताही अन्याय झालेला नसून, शिवसेनेने त्यांना भरपूर काही दिले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी दिली. शिवसेनेच्या बंडखोरांना १४ तारखेपर्यंतची अंतिम डेडलाईन देण्यात आली आहे. त्यांनी जर १४ तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले.

महेश कोठेंवर कोणताही अन्याय नाही - शिवाजी सांवत

महेश कोठे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले तेव्हा सेनेने त्यांची जात बघितली नाही. १०५ नगरसेवकांचे एबी फॉर्म कोणाला द्यायचे याचे सर्व अधिकार कोठेंना देताना सेनेने त्यांची जात बघितली नसल्याचे सावंत म्हणाले. त्यामुळे कोठेंनी जातीचा विषय काढणे चुकीचे असल्याचे सावंत म्हणाले. शिवसेनेने निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिले असल्याचेही सावंत म्हणाले.

सोलापूर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपत देताना तसेच जवळच्या व्यक्तीला स्वीकृत सदस्य करताना सेनेने त्यांची जात बघितली नाही. नेमके आज त्यांना विधानसभेच्या तिकिटापासून बाजूला ठेवले असतानाच त्यांची जात कशी काय वर आली? आताच कोठे यांनी जातीचे कार्ड कसे आणले? असा सवालही सावंत यांनी केला.

हेही वाचा - जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देऊ नका, प्रणिती शिंदेंचे मतदारांना आवाहन

हेही वाचा - अखेर मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरला राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये होणार विलिन

महेश कोठेंवर कोणताही अन्याय झालेला नसून, शिवसेनेने त्यांना भरपूर काही दिले असल्याचे सांगत येथे १४ तारखेपर्यंत बंडखोरीबाबत निर्णय न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा सावंत यांनी दिला. शिवसेनेत कधीही जातीपात केला जात नाही. जात बघीतली जात नाही. त्याचे काम बघितले जाते. त्या मतदारसंघामध्ये तो आमदार म्हणून निवडून येईल की नाही याची कुवत बघीतली जात असल्याचे सावंत म्हणाले.

सेनेत पैसे घेऊन उमेदवारी दिली जात नाही
सेनेत पैसे घेऊन उमेदवारी दिली जात नाही. कोणाला तिकीट द्यायचे हे उद्धव ठाकरे आणि संबंधित जिल्ह्याची टीम ठरवते. ज्यांनी असे बेछूट आरोप केले आहेत, त्यांनी पैसे घेतल्याचे सिद्ध करून दाखवावे. सावंत कुटुंबीयांवर आरोप करणे अत्यंत चुकीचे असून सावंत बंधू कोणाच्याही चहाच्या मिंद्यात नाहीत. जाणूनबुजून सावंत परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सावंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details