महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाळा विधानसभेसाठी शिवसेनेकडून रश्मी बागल यांना उमेदवारी - Maharashtra Assembly Elections 2109

करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाला आहे.

रश्मी बागल, शिवसेना उमेदवार करमाळा

By

Published : Oct 2, 2019, 5:43 PM IST

सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने बुधवारी पाटील गटाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात नारायण पाटील आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

हेही वाचा - तक्रार नोंदवून घेत नसल्याने एकाने घेतले पेटवून; उपचारादरम्यान मृत्यू

नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार होते. पाटील हे जरी सेनेचे आमदार असले तरी त्यांची मोहिते पाटीलांशी जास्त जवळीक होती. त्यामुळेच त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details