शिवसेना, भाजप एकत्र लढणार - नरेंद्र पाटील सोलापूर :सोलापुरात संभाजी आरमार यांच्या शिवजयंती सोहळ्यात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील सहभागी झाले होते. यावेळी पालखीला जिल्हाधिकारी मिलिंद सौंदेडकर, डीसीपी विजय कबाडे, नरेंद्र पाटील सहभागी झाले होते. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षावर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भाष्य केले आहे. राज्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत. केंद्रानेही ते मान्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत लढणार असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात घोषणा केल्याचे ते म्हणाले.
संभाजी आरमारच्या वतीने भव्य पालखी सोहळा :संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य पालखी मिरवणूक निघाली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, डीसीपी विजय कबाडे, नरेंद्र पाटील यांनी पालखीला खांदा देत सहभाग घेतला.
सोलापुरात सर्व चौकात पालखी मिरवणूक :संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांनी माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून ते विजापूर वेस, बेगम पेठ, मारुती चौक, दत्त चौक, या मार्गावरून शिवाजी महाराज चौकात निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून समारोप केला जाईल असे ते म्हणाले. संभाजी आरमारच्या विनंतीला मान देऊन अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पालखी सोहळ्यात शामिल झाले आहेत.
शिवसेना, भाजप एकत्र लढतील :खासदारकीच्या निवडणूकाशिवसेना, भाजप एकत्र लढतील असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष, चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाल्याने आनंद झाल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले.अमित शहा यांनी पुणे येथे झालेल्या भाषणात बोलताना सांगितले आहे, आगामी खासदारकीच्या निवडणूका या शिवसेना, भाजप एकत्र लढणार आहे. केंद्राला ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य आहे. राज्यातील जनतेलाही हे नेतृत्व मान्य असून समस्त शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या पाठीशी असणार आहे.
हेही वाचा -Shiv Jayanti 2023 : ट्रेन मॅनेजर व मोटरमन बांधवांनी उत्साहात साजरा केला शिवजयंती उत्सव