महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूरच्या शिवसैनिकाने स्वखर्चातून सुरू केली शिवथाळी

सोलापूर शहराच्या पूर्व भागातील कष्टकरी वस्तीत देविदास कोळी हा शिवसैनिक आपले छोटे कँटीन चालवतात. राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर कोळी यांनी आपल्या नेत्याप्रति निष्ठा व्यक्त करत शिवभोजन थाळी सुरू केली आहे.

solapur
सोलापूरच्या शिवसैनिकाने स्वखर्चातून सुरु केली शिवथाळी

By

Published : Jan 6, 2020, 12:44 PM IST

सोलापूर -गोरगरिबांसाठी दहा रुपयात शिवभोजन देण्याची योजना सुरू करणार असल्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. महसूल विभागाची आजवरची वाटचाल पाहता ही योजना कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाही. मात्र, विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या नेत्याने दिलेला शब्द पूर्ण करण्याचा ध्यास एका शिवसैनिकाने घेतला असून त्याने स्वखर्चातून शिवभोजन थाळी सुरू केली आहे. त्यामुळे सरकारच्या आधी सोलापूरकरांना आता शिवसैनिकाची शिवभोजन थाळीची चव चाखायला मिळणार आहे.

सोलापूरच्या शिवसैनिकाने स्वखर्चातून सुरू केली शिवथाळी

हेही वाचा -सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन : देश-विदेशातील 6 हजार धावपटूंचा सहभाग

सोलापूर शहराच्या पूर्व भागातील कष्टकरी वस्तीत देविदास कोळी हा शिवसैनिक आपले छोटे कँटीन चालवतात. राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर कोळी यांनी आपल्या नेत्या प्रती निष्ठा व्यक्त करत शिवभोजन थाळी सुरू केली आहे. ही योजना ज्या ठिकाणी राबवली जाणार आहे. तिथे शहरी भागात चाळीस रुपये आणि ग्रामीण भागात वीस रुपये सरकारी अनुदान मिळणार आहे. अनुदानासाठी कागदावर थाळ्या वाढवून दाखवण्याचे प्रकारही भविष्यात होऊ शकतील. मात्र, नीलम नगर परिसरातील देविदास कोळी यांनी या वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वखर्चातून शिवभोजन देण्याचा संकल्प केला आहे.

हेही वाचा -सोलापुरात 'हाफ मॅरेथॉन'पूर्वी 'हायड्रोजन' गॅसच्या टाकीचा स्फोट, चौघे जखमी

शहरातील गरजूंच्या मुखी घास जावा आणि तोही ही अत्यंत कमी पैशात असे स्वप्न घेऊन ते सत्यात उतरण्याचा यशस्वी प्रयत्न कोळी करत आहेत. एखाद्या धनदांडग्याने असा निर्णय घेणे विशेष नसेल. मात्र, सामान्य कुटुंबातील देविदास कोळीसारख्या शिवसैनिकाने अशा पद्धतीने स्वतःच्या पैशातून दहा रुपयात गोरगरिबांना शिवथाळी उपलब्ध करून देणे, म्हणजे शिवधनुष्यच उचलल्यासारखे आहे. शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम आणि मुख्यमंत्री या नात्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरविण्याच्या हेतूने देवीदास कोळी यांनी हे पाऊल उचलले आहे. छोटेस कँटिन चालवणाऱ्या देविदास कोळी यांचा हेतू सेवा करण्याचा असून अनुदान रुपी मेवा मिळण्याची अपेक्षा न करता त्यांनी हा उपक्रम चालू केल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details