सोलापूर Jyoti Waghmare On Uddhav Thackeray: शिवसेनेची आन, किंवा शान म्हणजे शाखा आहे. उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या मुंब्रा येथील शाखेला भाड्याने दिलं होतं. शिवसेनेची शाखा भाड्याने देणं म्हणजे आईच दूध विकल्या सारख आहे. उद्धव ठाकरेना ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी ठाकरे म्हणण्याऐवजी वाकडे आणि वाखरे अशी उपाधी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव वाखरेनी शिवसेनेला गहाण ठेवण्याचं पाप केलं. मुंबई महानगरपालिका भाड्याने दिली. स्वतःचा पक्ष काँग्रेसला भाड्याने दिला अशी खरमरीत टीका ज्योती वाघमारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
उद्धव ठाकरेंवर केली टीका : सणासुदीच्या काळात उद्धव ठाकरे लोकांना वेठीस धरण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांना ऐन सणासुदीलाच वादविवाद करण्याचं किंवा वातावरण पेटवण्याचं का सुचतंय असा प्रश्न ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला. राज्यातील जनतेला सुखा समाधानाने आनंदाने दिवाळी करू न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे की काय? असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. दिवाळीच्या काळात त्यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या आहेत का? असे अनेक प्रश्न ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केले आहेत. शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी शनिवारी सायंकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली.