महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या अंहकारी नेतृत्वाकडे मुळप्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची किमया - शत्रुघ्न सिन्हा - vidhan Sabha election 2019

सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कुमठा नाका येथे जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिंहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

शत्रुघ्न सिन्हा

By

Published : Oct 16, 2019, 9:22 PM IST

सोलापूर - देशातील आर्थिक मंदी, भुकबळी आणि बेरोजगारी या गंभीर प्रश्नांपासून देशवासीयांच लक्ष विचलित करण्याची किमया अहंकारी नेतृत्वाने साधली आहे, अशी टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता सिन्हा यांनी सोलापुरातल्या सभेत सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा खरपूस समाचार घेतला.

जाहीर सभेत बोलताना शत्रुघ्न सिन्हा

सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कुमठा नाका येथे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिंहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

सिन्हा म्हणाले, आधी नोटबंदी आणून मग जीएसटी लादून देशाची वाट लावली आणि आता फक्त बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक, 370 कलम लागू केल्याचे भांडवल केले जात आहे. सभेच्या सरतेशेवटी त्यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, भूकबळी या प्रश्नांकडे लक्ष वेधताना भूकबळीच्या बाबतीत जगातल्या 117 देशांत भारताचा 102 वा क्रमांक लागतो. तर, पाकिस्तान, बांग्लादेश सारखे देश नव्वदीच्या घरात असल्याची टीका त्यांनी केली. या सभेच्या निमित्ताने शत्रुघ्न सिन्हा यांनी एक प्रकारे सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. आता, त्याला मतदार किती गंभीरपणे घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

हेही वाचा - आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा; रश्मी बागल यांना मोठा धक्का

हेही वाचा - भालके की परिचारक; कोण होणार पंढरीचा राजकीय संत?

ABOUT THE AUTHOR

...view details