महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शरद पवार समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयातून अजित पवारांचे फोटो काढले

सोलापूरातील शरद पवार समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला. यावेळी त्यांनी आमचा शरद पवारांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

Maharashtra Political Crisis
अजित पवारांचे फोटो काढले

By

Published : Jul 3, 2023, 10:22 PM IST

पहा व्हिडिओ

सोलापूर : अजित पवारांच्या बंडानंतर सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार समर्थक व शरद पवार समर्थक असे दोन गट निर्माण झाले आहेत. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात अजित पवार समर्थकांनी जल्लोष केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार समर्थकांनी शरद पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला.

शरद पवारांना समर्थन जाहीर केले : आज शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात तातडीची बैठक संपन्न झाली. यावेळी शरद पवारांच्या समर्थकांनी आपण त्यांच्या पाठीशी आहोत असे जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी स्पष्ट केले की, ते अजित पवार यांचे अजिबात समर्थन करत नाहीत.


'मुस्लिम समाज शरद पवारांसोबत' : सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला शहर अध्यक्ष भारत जाधव, माजी शहर अध्यक्ष महेश गादेकर, मनोहर सपाटे, गफूर शेख, फारूक मटके, प्रशांत बाबर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना फारूक मटके म्हणाले की, सोलापुरातील मुस्लिम समाज हा राष्ट्रवादीसोबत आहे. जर अजित पवार हे हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री होत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा नाही. आम्ही राष्ट्रवादीमधील सर्व मुस्लिम शरद पवारांच्या पाठीशी आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या बॅनरवर शाई लावली : राष्ट्रवादी कार्यालयातील बैठकीनंतर शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद सुरू असताना भिंतीवरील अजित पवार यांचा फोटो काढण्यात आला. सोलापूर राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयातील या बैठकीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्या व माजी महिला नगरसेविकांनी कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच यावेळी कार्यालयातील अजित पवार यांच्या बॅनरवर शाई लावण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्वांनी आम्ही शरद पवारांसोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिली. शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनार्थ महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा :

  1. Dhananjay Munde Supporters Celebration : मंत्रीपद मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांचा जल्लोष, प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आनंद साजरा
  2. Maharashtra Political Crisis : अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष बदलला, म्हणाले, 'राष्ट्रीय अध्यक्ष...'
  3. Election Card On Sell : 'मतदान कार्ड विकणे आहे'..अकोल्यातील या युवकाने चक्क मतदान कार्ड विक्रीला काढलं!, पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details