महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारने शिवाजी स्मारकाचे आश्वासन पाळले नाही - शरद पवार - शरद पवारांची पंढरपूरमध्ये भाजपवर टीका

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात शरद पवारांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी भाजप सरकारकडून होणारा सरकारी यंत्रणाचा गैरवापर यासह इतर मुद्द्यावर चौफेर टीका केली.

शरद पवार

By

Published : Oct 19, 2019, 1:14 PM IST

सोलापूर- या सरकाने कोणतेही आश्वासन पाळले नाही. मग ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे असो किंवा बाबासाहेबांच्या स्मारकाचे. आजपर्यंत माझ्यावर कोणता गुन्हा दाखल नव्हता. मात्र, भाजपने तो दाखल केला आहे. सीबीआय, आयबी, ईडी या सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग हे सरकार करत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते पंढरपूर येथील आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

शरद पवार सभेत बोलताना

हेही वाचा - 'त्या' वक्तव्याबद्दल राऊतांविरोधात बार्शीत मूक मोर्चा

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात शरद पवारांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी भाजप सरकारकडून होणारा सरकारी यंत्रणाचा गैरवापर यासह इतर मुद्द्यावर चौफेर टीका केली.

हेही वाचा - करमाळा : कन्याकुमारी एक्सप्रेसला रेल्वेरुळावर दगड ठेवून अडवण्याचा प्रयत्न

यावेळी पवार म्हणाले, तरुण पिढीच्या हाताला काम दिले पाहिजे होते. मात्र, या 5 वर्षात निम्मे कारखाने बंद पडले आहेत. अनेक कारखाने आजारी आहेत. सरकार कोणतेही याबाबत ठोस पाऊल उचलत नाही. तर नवीन आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायची गरज असताना, पुस्तकातून महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम हे सरकार करत आहे, असेही पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details