पंढरपूर (सोलापूर) -पांडुरंगाच्या नगरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पंढरपूर शहरात मन हेलवणारी घटना घडली आहे. एका नराधमाने सात दिवस पीडित मुलीवर अत्याचार केले. अत्याचार करणारा आरोपी हा प्रस्थापित नेत्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहे. पंढरपूर शहर पोलीस कारवाई करत असताना राज्य सरकारकडून दबाव येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे पेटून उठेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.