टिळक राष्ट्रीय पुरस्काराबाबत मत व्यक्त करताना सुशीलकुमार शिंदे सोलापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोध करत त्यावर आक्षेप घेतला आहे. पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी देखील वरिष्ठांना पत्र लिहिले आहे. एकीकडे पुणे काँग्रेसचा विरोध होत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे मात्र मौन बाळगून आहेत.
काय म्हणाले शिंदे -गुरुवारी सकाळी सोलापूर शहरातील फडकुले सभागृहात महाराष्ट्र राज्य गांधी फोरमचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी हयात असले असते तर त्यांनी राज्यातील नाट्यमय घडामोडी पाहून सर्वच बरखास्त केले असते, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
काय आहे टिळक राष्ट्रीय पुरस्कार वाद -टिळक स्मारकच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातो. यावर्षी रोहित टिळक यांनी पत्रकार परिषद घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर केला. रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. पुणे शहर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी या पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे. आक्षेपाचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनादेखील पाठवले आहे. यापूर्वी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी आदींना दिला आहे. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री बघितले :महाराष्ट्र राज्यात राजकीय समीकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सुशीलकुमार शिंदेनी भाष्य केले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी महायुतीचे सरकार स्थापना केले आहे. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री बघितले अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी केली. ज्याप्रमाणे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली तशी काँग्रेस फुटणार नाही असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेनी व्यक्त केला.
हेही वाचा:
- Deepak Kesarkar: कंत्राटी निवृत्त शिक्षक भरण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू- आ. जयंत आसगावकर यांचा इशारा
- Supreme Court Judges Appointed : कॉलेजियम शिफारशीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन न्यायााधीशांची निवड, कोण आहेत हे न्यायाधीश?
- Deepak Kesarkar: कंत्राटी निवृत्त शिक्षक भरण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू- आ. जयंत आसगावकर यांचा इशारा