महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद - सोलापूर लेटेस्ट न्यूज

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत.

schools, colleges, cinemas, swimming pools will remain closed till October 31 in In Solapur district
सोलापूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

By

Published : Oct 1, 2020, 10:27 PM IST

सोलापूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात, पोलीस आयुक्तालय हद्द वगळून लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी सायंकाळी आदेश जारी केले आहेत. यापूर्वी ज्या उपक्रमाला वेळोवेळी सशर्त परवानगी देण्यात आली होती, ते यापूर्वीप्रमाणे लागू राहतील. कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाचे पालन करणे आवश्यक असून दोषीविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.

सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी सहा फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात येण्यास परवानगी देऊ नये. मोठ्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी 50 नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी आहे. अंत्ययात्रेला 20 नागरिकांना एकत्र येऊ शकतील. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी असून दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवनावर कडक निर्बंध असणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काय बंद राहणार -

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. मात्र ऑनलाईन/दूरस्थ शिक्षणाला परवानगी
  • सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स (मॉलमधील व बाजार संकुलातील थिअटर्ससह), सभागृहे
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सभा
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिलेले प्रवाशी वगळून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी

    काय सुरू राहणार -
  • सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने/आस्थापना यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेल्या निर्देशानुसार सुरू राहतील
  • यापूर्वी वेळोवेळी चालू करण्यास मान्यता दिलेले उपक्रम यापुढेही चालू राहतील
  • हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट, बार यांना 5 ऑक्टोबर 2020 पासून एकूण क्षमतेच्या 50 टक्के, स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेनुसार परवानगी असेल, आवश्यक त्या उपाययोजनाबाबत महाराष्ट्र पर्यटन विभाग मानक कार्यपद्धती निश्चित करेल
  • ऑक्सिजनची वाहतूक करणारी वाहने राज्यात व राज्याबाहेर वेळेच्या बंधनाशिवाय मुक्तपणे वाहतूक, ऑक्सिजन उत्पादक कारखान्यांना व पुरवठाधारक/वितरकांना बंधने असणार नाहीत
  • केंद्र/ राज्य शासनाने कोविड-19 बाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करून राज्यातून सुरू होणाऱ्या व संपणाऱ्या सर्व रेल्वे तत्काळ सुरू होतील

ABOUT THE AUTHOR

...view details