महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur School Timings : कडक उन्हामुळे सोलापुरातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

सोलापुरातील उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. ( Heat in Solapur ) वाढत्या कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांची गैरहजरी वाढत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरले जाणार असल्याची माहिती दिली. ( School Timing Changed in Solapur ) हा निर्णय 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 7.30 ते दुपारी 12 या कालावधीत भरणार असल्याची अधिकृत माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार ( Solapur Primary Education Officer Kiran Lohar ) यांनी दिली.

School Timing Changed in Solapur Due to severe heat
कडक उन्हामुळे सोलापुरातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार

By

Published : Mar 29, 2022, 5:54 PM IST

सोलापूर -सोलापुरातील उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. ( Heat in Solapur ) वाढत्या कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांची गैरहजरी वाढत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरले जाणार असल्याची माहिती दिली. ( School Timing Changed in Solapur ) हा निर्णय 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 7.30 ते दुपारी 12 या कालावधीत भरणार असल्याची अधिकृत माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार ( Solapur Primary Education Officer Kiran Lohar ) यांनी दिली. हा निर्णय उद्यापासून लागू होणार असल्याची माहिती दिली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार याबाबत बोलताना

पालकांचा व शिक्षक संघटनांचा विरोध -या अगोदर सकाळी 10.30 ते दुपारी 5 या वेळेत शाळा भरत होत्या. मात्र, कडक उन्हामुळे अनेक विद्यार्थी गैरहजर राहत आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गैरहजेरीमुळे अनेक पालकांनी आणि शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनी विरोध केला. या विरोधाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी ताबडतोब निर्णय घेत सकाळच्या सत्रात शाळा भरणार असल्याचा आदेश पारित केला. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक शाळा (पहिली ते आठवीपर्यंतच्या) सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 5 वाजेपर्यंत भरतील, असे आदेशात नमूद केले होते. शासन स्तरावरुनही तसे आदेश प्राप्त झाले होते. मात्र, कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढताना कडक उन्हाळ्याचा विचार त्या आदेशात केला नव्हता. पालकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर सोलापूर शिक्षण विभागाने नमती भूमिका घेत शाळेच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

हेही वाचा -Biometric pass Sai Baba Temple: आता भक्तांना थेट साई मंदिरात जाता येणार.. बायोमेट्रिक पास व्यवस्था होणार बंद

नव्या आदेशात काय? -प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7.10 ला परिपाठ होईल. त्यानंतर 7.25 वाजल्या पासून दुपारी 12.30 पर्यंत एकूण नऊ तास घ्यावेत असे नव्या आदेशात नमूद केले आहे. प्रत्येक तासिकेची वेळ ही 30 मिनिटांची असेल. नवीन आदेशाची सर्व गट शिक्षणाधीकारी, महानगरपालिका, नगरपालिकांच्या प्रशासन अधिकारी यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details