महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर; अन् जिल्हा परिषदेतील सीईओ कार्यालसमोरच भरली शाळा - solapur zilla parishad latest news

तिऱ्हे गावातील शाळेसमोर थाटलेल्या या दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची व अंमली पदार्थाची विक्री सर्रास होत आहे. नियमाप्रमाणे शाळेच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही अंमली पदार्थांची विक्री करता येत नाही. तरीदेखील शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अंमली पदार्थ आणि तंबाकूजन्य पदार्थांची विक्री होत आहे.

अन् जिल्हा परिषदेतील सीईओ कार्यालसमोरच भरली शाळा
अन् जिल्हा परिषदेतील सीईओ कार्यालसमोरच भरली शाळा

By

Published : Feb 9, 2021, 10:16 AM IST

Updated : Feb 9, 2021, 10:48 AM IST

सोलापूर- उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शाळा भरवली. जिल्हा परिषद आवारात अचानक विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू झाल्याने अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.

सोलापूर; अन् जिल्हा परिषदेतील सीईओ कार्यालसमोरच भरली शाळा
महामार्गाच्या कामात शाळेच्या खोल्या पडल्यासोलापूर-सांगली-कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गावर तिऱ्हे गाव वसले आहे. तसेच महामार्गाला चिटकूनच जिल्हा परिषद शाळा आहे. या महामार्गाच्या कामात शाळेच्या दोन खोल्या पाडण्यात आल्या आहेत. उरलेल्या सहा खोल्यांमध्ये वेगवेगळे वर्ग भरतात. मात्र, शाळेच्या या वर्गांसमोर पान टपऱ्या, कँन्टीन, किराणा दुकाने थाटली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही.कोरोना काळात शाळा बंद असल्याने अतिक्रमणे वाढलीकोरोना महामारी सुरू झाल्यापासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. गेल्या १० महिन्यांपासून शाळा बंद आहेत. अनलॉकनंतर दैनंदिन व्यवहार सुरू झाले, पण शाळा बंदच होत्या. या बंद काळात तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर अतिक्रमण वाढले. आता शासनाच्या आदेशाने शाळा सुरू झाल्या. पण वाढलेल्या अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत जाणारा रस्ताच बंद झाला आहे.शाळेच्या परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीस बंदी-तिऱ्हे गावातील शाळेसमोर थाटलेल्या या दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची व अंमली पदार्थाची विक्री सर्रास होत आहे. नियमाप्रमाणे शाळेच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही अंमली पदार्थांची विक्री करता येत नाही. तरीदेखील शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अंमली पदार्थ आणि तंबाकूजन्य पदार्थांची विक्री होत आहे.दोन दिवसांत अतिक्रमण हटवण्याची ग्वाहीमुलांच्या या आंदोलनाची तात्काळ दखल घेत दोन दिवसात शाळेसमोरील अतिक्रमण हटवून शाळा पुन्हा सुरु करून देऊ, असे आश्वासन सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे
Last Updated : Feb 9, 2021, 10:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details