सोलापूर- शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढल्याने कोरोनावरील औषधसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी कोरोना रुग्णांचे नातेवाईकांवर वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. मार्कंडेय रुग्णालय, गंगामाई रुग्णालय, अश्विनी रुग्णालय आदी खाजगी रुग्णालयातील रुग्ण नातेवाईक सोलापुरातील प्रत्येक मेडिकल दुकानांत जाऊन रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करू लागले असल्याची माहिती हुमा मेडिकल चालक यासिन शेख यांनी दिली.
सोलापूरसह राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा; रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण - रेमडेसिविर इंजेक्शन
सोलापूरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर इंजेक्शनचा डोस मिळत नाही. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे.
हेही वाचा -नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची गोळ्या झाडून हत्या
हजारो इंजेक्शनची मागणी वाढल्याने मेडिकल दुकानांवर ताण-
हुमा मेडिकल, उमा मेडिकल, युनायटेड मेडिकल हे शहरातील प्रसिद्ध मेडिकल आहेत. पण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी वाढल्याने शहरातील मेडिकल दुकानांमधील उपलब्ध साठा पुर्णतः संपला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.
शासनाने माल उचलल्याने तुटवडा निर्माण झाला -
महाराष्ट्र राज्य शासनाने मायलान या फार्मा कंपनीचा मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केल्यामुळे खाजगी भागात हे इंजेक्शन उपलब्ध नाहीत. सिपला, हेट्रो या कंपन्याचे इंजेक्शन देखील मेडिकल दुकानांत उपलब्ध नाहीत. शासनाने गंभीर होत हा तुटवडा भरून काढावा, अशी मागणी यावेळी रुग्णांचे नातेवाईक करू लागले आहेत.
हेही वाचा -अक्षय कुमारला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती