सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकांनी (Jewellers) सोमवारी (24 ऑगस्ट) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. केंद्र सरकारने पारित केलेल्या हॉलमार्क (Hallmark) कायद्यातील जाचक तरतुदी मागे घेण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. सोलापुरातील (in Solapur) 500 दुकानदारांनी या बंदमध्ये सहभाग घेत कडकडीत बंद पाळला होता. यामुळे सोलापुरात जवळपास 5 कोटींची उलाढाल ठप्प झाली. सराफ संघटनेच्या नेत्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
सोलापुरातील सराफ व्यवसायिक व्यवसायिकांचा इशारा
सराफ व्यवसायिकांनी हॉलमार्क कायद्यातील जाचक तरतुदी मागे घेण्यासाठी लाक्षणिक संप पुराकरला. याला सर्वांनी पाठिंबाही दिली. आताया जाचक अटी रद्द न झाल्यास भविष्यात मोठे आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
काय आहेत हॉलमार्कच्या कायद्यातील तरतुदी?
नव्या हॉलमार्कच्या कायद्यातील कलम 2 नुसार फक्त अधिकृत सरकार मान्यपरीक्षण केंद्रातून मानांकित केलेले (हॉलमार्क) सोन्याचे दागिने विक्री करण्याचे आदेश आहेत. 15 जून 2021 रोजी इंडियन बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन (इब्जा) या संस्थेसह देशभरातील विविध सराफ संघटनांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांच्या समवेत केंद्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर 16 जून रोजी 2021 पासून हा कायदा (Law) देशभरात लागू झाला आहे. देशातील 256 जिल्ह्यात जिथे हॉलमार्क सेन्टर आहे, तिथेच हा कायदा लागू केला आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 22 जिल्ह्यात हा कायदा लागू केला आहे. कलम 29 (2) नुसार जर विना हॉलमार्क दागिना (Gold) विक्रीसाठी ठेवल्यास एका वर्षापर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंड अथवा वस्तूच्या किमतीपेक्षा पाचपट रक्कम दंड वसूल केली जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.
हॉलमार्क सोने खरेदी ग्राहकांच्या फायद्याचीच; आता सोन्याच्या वस्तूवर दुकानदाराचाही येणार स्टॅम्प
काय आहे सराफ व्यवसायिकांची मागणी?
देशभरातील सराफ व्यापारी या कायद्याचा विरोध करत आहेत. हॉलमार्कसाठी ज्या जाचक अटी आहेत, त्याला सराफ व्यापाऱ्यांचा विरोध आहे. म्हणजे एखादा दागिना हॉलमार्क सेन्टरमध्ये पाठवल्यास त्याला बीआयएस अधिकारी मान्यता देतात. नंतर तेच अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत. जर सोन्याच्या दागिन्यात काही त्रुटी आढळल्यास सोनार दुकानाचे लायसन रद्द करून त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित सराफ व्यसायिकावर खटला दाखल करून 3 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सराफ व्यसायिक म्हणतात, की 'सोन्याच्या दागिन्यात दोष आढळल्यास मान्यता देऊच नका. मान्यता देऊन पुन्हा कारवाईसाठी का येता?'. दरम्यान, असा सवाल उपस्थित करून हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.
हेही वाचा -Video : 'मी असतो तर कानाखालीच मारली असती', उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणेंची जीभ घसरली