सोलापूर - दुष्काळाची छाया किती गडद आहे, याची जाणीव आज वारीतील भाविकांना झाली. दुष्काळामुळे कोरडी ठाक पडलेल्या नीरा नदीच्या पात्रात प्रशासनाला पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या टँकर्समधून पाणी आणून सोडण्याची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना नदीऐवजी साठवलेल्या पाण्याने स्नान करावे लागले.
दुष्काळामुळे नीरा नदीत टँकरने पाणी सोडून तुकारामांच्या पादुकांचे नीरास्नान - Palkhi Sohala
दुष्काळामुळे कोरडी ठाक पडलेल्या नीरा नदीच्या पात्रात प्रशासनाला पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या टँकर्समधून पाणी आणून सोडण्याची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले.
तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेताना भाविक
देहू-आळंदीहून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना यंदाच्या वर्षी पडलेल्या तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. एवढचं नाही तर खुद्द पालखी सोहळा प्रमुखांना संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यासाठी टँकरने सोडलेल्या पाण्याचा वापर करावा लागला. त्यामुळे या आषाढीला लांबलेल्या पावसाने ग्रामीण महाराष्ट्रातील जनजीवन हतबल झाल्यामुळे वारकरी बा विठ्ठलाकडे पाऊसाची मागणी करेल, यात कोणतीच शंका नाही.