सोलापूर - संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलली आहेत. त्यामुळे रत्नाकर गुट्टेंना जसे तुरुंगात टाकले तसे त्यांनाही टाकू, असा धमकीवजा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. संजय शिंदे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे.
संजय शिंदेंचा रत्नाकर गुट्टे करू, चंद्रकांत पाटलांचा धमकीवजा इशारा - निवडणूक
संजय शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मदतीने जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळवले. मात्र, निवडणुक जवळ येताच राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. त्यामुळे शिंदे भाजपच्या निशाण्यावर आहेत.
![संजय शिंदेंचा रत्नाकर गुट्टे करू, चंद्रकांत पाटलांचा धमकीवजा इशारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2875412-636-281aebf2-3180-48c9-9a32-843dbac321be.jpg)
संजय शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मदतीने जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळवले. मात्र, निवडणुक जवळ येताच राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. त्यामुळे शिंदे भाजपच्या निशाण्यावर आहेत.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर फॅक्टरीचे संचालक रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले होते. त्या प्रकरणी त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले आहे. याच प्रकरणाचा संदर्भ पाटली यांनी दिला. गुट्टेंप्रमाणे शिंदेंना देखील गजाआड पाठवू असे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात माढा मतदारसंघात सुडाचे राजकारण पहायला मिळणार असे दिसत आहे.