महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' पुस्तकाचं वितरण थांबवा अन्यथा भांडारकर करु, संभाजी ब्रिगेडचा इशारा - आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे वितरण थांबवा अन्यथा भांडारकर करु

छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशित केले आहे. त्यांनतर राज्यात तीव्र संतोषाची लाट निर्माण झाली आहे. अनेक संघटनांकडून या प्रकाराचा निषेध होत आहे.

Sambhaji brigade warning to BJP
जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन

By

Published : Jan 13, 2020, 1:56 PM IST

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. त्यांनतर राज्यात तीव्र संतोषाची लाट निर्माण झाली आहे. अनेक संघटनांकडून या प्रकाराचा निषेध होत आहे. यात आता संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली आहे. या पुस्तकाचे वितरण त्वरीत थांबवावे, अन्यथा पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटप्रमाणे आंदोलन करावं लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन केले.

संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा


दिल्लीत भाजपच्या धार्मिक आणि सांस्कृतीक संमेलनात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनतर सर्वच स्तरातून यावर जोरदार टीका होताना दिसतेय. सोलापूरमध्येही या प्रकारावरुन संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्यावतीने जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. सोलापुरातल्या ४ पुतळा चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details