सोलापूर - महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल (Hershal Bagal, spokesperson of Sambhaji Brigade) यांनी केला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे. आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (Keshav Sitaram Thackeray) यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.
संभाजी ब्रिगेडचा राज ठाकरेंना प्रश्न
'प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्राचे प्रबोधन त्यांच्या साहित्यातून केले. त्यांनी त्यांच्या रंगो बापुची नावाच्या 40 पानांच्या पुस्तकात पुरंदरे यांची सर्व चलाखी उघड केली आहे. ते पुरंदरेच्या लेखनाला भटी लिखाण म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे कसले शाहीर? हा तर सोंगाड्या आहे, असे विधान केले होते. जेम्स लेनच्या नावाखाली जिजाऊंची व शिवरायांची बदनामी करणारे हेच ते पुरंदरे आहेत. पंढरपूरला अमरजित पाटील यांच्याकडे शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू नाहीत, हे लेखी देऊन माफी मागावी लागली होती. जेम्स लेन समर्थक बहुलकरांच्या तोडांला पुण्यात शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमींनी काळे फासले होते. त्यांना माफी मागायला राज ठाकरे यांनी भाग पाडले होते. त्यामुळे आपण प्रबोधनकरांचे नातू आहात की पुरंदरेंचे? ते आधी एकदा स्पष्ट करावे', असा सवाल हर्षल बागल यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' महाविकास आघाडी सरकारने परत घ्यावा- संभाजी ब्रिगेड