महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करा, संभाजी ब्रिगेडची मागणी - तानाजी चित्रपट करमुक्त

हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा, यासाठी राज्य सरकारने तान्हाजी हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे.

Sambhaji Brigade
शाम कदम

By

Published : Jan 14, 2020, 4:01 PM IST

सोलापूर- 'तान्हाजी-द अनसंग वॉरियर' हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे.

शाम कदम, शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

हेही वाचा - करमाळा युवा सेनेकडून जय भगवान गोयलच्या पुतळ्याचे दहन

नुकताच प्रदर्शित झालेला तान्हाजी हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याचा विषय घेऊन तयार करण्यात आलेला चित्रपट आहे. हा चित्रपट कौटुंबीक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास पुन्हा जागा करणारा चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा, यासाठी राज्य सरकारने तान्हाजी हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'तुमच्या सगळ्यांचा बाप आला'...सोलापूर शिवसेनेत पुन्हा 'फ्लेक्स वॉर'

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. सध्या तिकिटाचे दर खूप वाढलेले असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा चित्रपट पाहता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ हा चित्रपट करमुक्त करून सर्वसामान्य लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा इतिहास चित्र रुपात पडद्यावर पाहता यावा, यासाठी पुढाकार घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details