सोलापूर - सोलापूर महापालिकेने थकीत भाडे व भाडेवाढीसाठी पार्क चौक स्टेडियम येथील 59 व्यापाऱ्यांचे गाळे सील करण्याची कारवाई केली आहे. या कारवाई विरोधात गाळे व्यापाऱ्यांच्या बाजूने संभाजी आरमार आक्रमक झाली असून त्यांनी महापालिकेच्या मुख्य फाटकाबाहेर निदर्शने करत महापालिकेच्या फाटकाला टाळे ठोकून सील केले.
सकाळी गाळ्यांना सील केले तर संध्याकाळी महानगरपालिकेला टाळे ठोकले
सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 22 मार्च) सकाळी पार्क स्टेडियम येथील 59 गाळे थकबाकीमुळे सील केले आहे. त्या विरोधात संभाजी आरमार आक्रमक होत सांयकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य फाटकाला टाळे ठोकून निषेध केला. शहराच्या मुख्य भागातील 59 गाळे सील केल्याने व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. कोरोनाच्या नियमावलीमुळे व्यापाऱ्यांवर व्यवसाय करण्यासाठी स्थानिक प्रशासननाने अनेक निर्बंध घातले आहेत. आता थकबाकीमुळे करण्यात आलेला कारवाई ही अन्यायकारक असल्याचे संभाजी आरमारने व्यक्त केले.
फाटकाला टाळे ठोकल्यामुळे पालिका कर्मचारी पडले अडकून