महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा समाजाच्या नावाखाली 'दुकानदारी' नको, उमेदवारांच्या 'भेटी' घेणारे हे आमचे प्रतिनिधी नाहीत - maratha community Role

सकल मराठा समाजाच्या नावाखाली मराठा समाजातील काही मंडळी हे सोलापूर लोकसभेच्या विविध पक्षांच्या उमेदवाराच्या भेटी घेत असून या भेटी त्यांच्या व्यक्तिगत भेटी आहेत. संपूर्ण समाजाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. याचे स्पष्टीकरण सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन देण्यात आले आहे.

मराठा समाजाची भूमिका मांडताना पदाधिकारी

By

Published : Apr 15, 2019, 4:57 PM IST


सोलापूर- सकल मराठा समाजाच्या नावाखाली मराठा समाजातील काही मंडळी हे सोलापूर लोकसभेच्या विविध पक्षांच्या उमेदवाराच्या भेटी घेत असून या भेटी त्यांच्या व्यक्तिगत भेटी आहेत. संपूर्ण समाजाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. याचे स्पष्टीकरण सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन देण्यात आले आहे.

मराठा समाजाची भूमिका मांडताना पदाधिकारी

सकल मराठा समाजाचे सोलापुरातील स्थानिक समन्वयक माऊली पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे तसेच बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाच्या बाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजातील समन्वयकाची भूमिका बजावणाऱ्या काही लोकांनी उमेदवारांच्या भेटी घेतल्यामुळे समाजातील इतर लोकांनी या भेटींना आक्षेप घेतला आहे. माऊली पवार यांनी घेतलेल्या भेटी या त्यांच्या व्यक्तिगत भेटी असून समाजाची त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण आज पत्रकार परिषदेत करण्यात आले.

मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते आणि नेते हे वेगवेगळ्या पक्षात काम करत आहेत. ते त्यांच्या पक्षासाठी काम करत राहतील तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, समाज म्हणून कोणत्या एका पक्षाच्या पाठीमागे उभे राहायचे नाही, अशी भूमिका अगोदरच घेतलेली आहे. त्यामुळे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांचा कोणत्याही एका पक्षाला पाठिंबा नाही. त्यामुळे सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली कोणी दुकानदारी करत असेल तर त्यांनी तत्काळ थांबवावी. अशी मागणीही रवी मोहिते यांच्यासह राम जाधव, मकरंद माने, मोहन चोपडे आणि सागर शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केली.


महाराष्ट्रात एक राजकीय व्यासपीठ म्हणून मराठ्यांचे एकीचे प्रतीक ठरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या आणि त्यावर झालेला निर्णयाबाबत प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या मराठा समाजाच्या मनात शंका आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. मराठा समाजाच्या मनात असलेला प्रश्न आणि त्या घोषणांच्या मागील सत्यता यावर समाजाला व्यक्त होण्याची संधी आणि आपल्यावर झालेल्या अन्याय आणि सरकारने घेतलेली भूमिका या सर्व गोष्टीवर मंथन करण्यासाठी सोलापूरमध्ये राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. भविष्यात सर्व मराठा समाज एकत्र राहावा आणि संघटित राहावा व राजकीय वादाचे पुनर्वसन समाजामध्ये होऊ नये, यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी राज्यातील समन्वयक हे सोलापुरातील बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details