महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'इंग्लिशमध्ये सांगू'.. म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीत किती गुण मिळाले माहिताहे का?

'मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू', हा डायलॉग मारणाऱ्या 'सैराट' गर्ल आर्ची उर्फ रिंकू राजगुरुला बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाला 54 गुण मिळाले आहेत.

By

Published : May 29, 2019, 7:40 PM IST

'इंग्लिशमध्ये सांगू'.. म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीत किती गुण मिळाले माहिताहे का?

सोलापूर - 'मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू', हा डायलॉग मारणाऱ्या 'सैराट' गर्ल आर्ची उर्फ रिंकू राजगुरुला बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाला 54 गुण मिळाले आहेत. इतर विषयांच्या तुलनेत रिंकुला इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने सैराट चित्रपटातील 'इंग्लिशमध्ये सांगू का' या लोकप्रिय डायलॉगची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

रिंकू राजगुरुने सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये रिंकू विशेष प्रविण्यासह पास झाली आहे. तिला मराठी विषयात 86, भूगोल 98, इतिहास 86, राज्यशास्त्र 83, अर्थशास्त्र 77 आणि पर्यावरण विषयात 49 असे एकूण 600 पैकी 533 गुण आणि एकूण टक्केवारीत 82 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, तिला इंग्रजी विषयात सर्वात कमी म्हणजे 54 गुण मिळाले आहेत.

चालूवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परिक्षेचा निकाल 85.88 टक्केच लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी हा निकाल कमी लागला आहे. यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details