महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी करमाळा मतदारसंघात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला - करमाळा मतदारसंघ

नागराज मंजुळे हे प्रत्येक निवडणुकीत गावाकडे येऊन आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावत असतात. आगामी त्यांच्या झुंड चित्रपटाचे कामकाज सुरू असतानाही त्यांनी गावाकडे येऊन मतदान केले.

सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी करमाळा मतदारसंघात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

By

Published : Oct 21, 2019, 11:50 PM IST

सोलापूर - प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, बालाजी मंजुळे (सनदी अधिकारी) व चित्रपट कलाकार अरबाज शेख यांनी मतदानासाठी आवर्जून आपल्या कुटुंब व मित्रपरिवारसहित मतदानाचा हक्क् बजावला. करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. यावेळी मूळचे जेऊरचे असलेले मंजुळे आले होते.

सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी करमाळा मतदारसंघात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

हेही वाचा - ​पुण्यात मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल, मतदान केंद्रावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

नागराज मंजुळे हे प्रत्येक निवडणुकीत गावाकडे येऊन आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावत असतात. आगामी त्यांच्या झुंड चित्रपटाचे कामकाज सुरू असतानाही त्यांनी गावाकडे येऊन मतदान केले. मतदान हे लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार आहे सर्वांनी मतदान करावे असे मतदारांना त्यांनी आवाहन केले. तसेच नियोजन विभागात सचिवपदी असलेले बालाजी मंजुळे यांनीही गावी येऊन आवर्जून मतदान केले. याआगोदरच्या झालेल्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिलेले आहे. परंतु, यावेळेस त्या प्रक्रियेत नसल्याने त्यांनी गावी येऊन मतदान केले आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सैराट चित्रपटातील सल्ल्या उर्फ अरबाज शेख यानेही पहिल्यादांच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या मित्रांसोबत येऊन त्याने मतदानाचे कर्तव्य बजावले. मागील लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये मतदानासाठी नावनोंदणी करूनही त्याचे मतदान यादीत नाव आले नव्हते. त्यामुळे तो मतदानापासून वंचित राहिला होता. तर मतदानासाठी पुन्हा अर्ज केल्याने विधानसभा निवडणुकीत मतदान यादीत त्याचे नाव आले. त्यामुळे त्याने आपल्या गावी येऊन मतदान केले. मतदान करून आनंद वाटला तर लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे गरजचे असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचला - मतदान केल्याचे शाईचे बोट दाखवा अन् मिसळवर मिळवा 10 टक्के डिस्काउंट

ABOUT THE AUTHOR

...view details