सोलापूर - पशुधन वाचावे, म्हणून ऐन दुष्काळात स्वतःच्या शेतातील 17 एकर ऊस दुसऱ्यांच्या जनावरांना मोफत देण्याची दानत मोहोळच्या एका महिला शेतकऱ्याने दाखवली आहे. रुक्मिणीताई खताळ (लांबोटी) असे त्यांच नाव आहे. यांनी पशुप्रेमाच्या भावनेतून आपल्या 17 एकर शिवारातील ऊस जनावरांसाठी दान केला आहे. तर रुक्मिणीताई यांच्याकडेही 100 च्या आसपास जनावरे असून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी या जनावरांनीच आधार दिल्याचे रुक्मिणीताई सांगतात.
पशुधनाने दिला दुष्काळाशी दोन हात करण्याचा आधार - रुक्मिणीताई खताळ
पशुधन वाचावे, म्हणून ऐन दुष्काळात स्वतःच्या शेतातील 17 एकर ऊस दुसऱ्यांच्या जनावरांना मोफत देण्याची दानत मोहोळच्या एका महिला शेतकऱ्याने दाखवली आहे.
रुक्मिणीताई खताळ यांनी त्यांच्याकडे काहीही नसताना 3 दगडांवर चुल मांडून लांबोटी चिवडा आणि चहाचा व्यवसाय सुरू केला होता. आता हा व्यवसाय नावारूपाला आला आहे. त्यांचा हा हॉटेल व्यवसाय असला तरी पशुधन हीच त्यांची संपत्ती असल्याचे रुक्मिणीताई सांगतात. त्यांच्याकडे सध्या शंभराच्या आसपास लहान-मोठी जनावरे आहेत. यंदा दुष्काळ पड्ल्यामुळे जनावरे संभाळायची कशी? हा रुक्मिणीताईसमोर प्रश्न पडला होता. मात्र, जनावरे कत्तलखान्यात जाऊ नये, अशी त्यांच्या पतीची शिकवण होती. ती रुक्मिणीताईंनीही आयुष्यभर जपलीय. त्या एखादे जनावर गावातील लोकांना मोफत देतात. मात्र, कत्तलखान्यात देत नाहीत.
जनावरांची देखभाल करण्यातच रुक्मिणीताईंचा दिवस जातो. त्या जनावरांवर आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे प्रेम करतात. विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आजही पशुधनाच्या जोरावर तग धरून आहे.