सोलापूर- अचूक नियोजन आणि दूरदृष्टीच्या नियोजनाने अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरपीआय (आठवले गट)ने सर्व पक्षांना धोबीपछाड करून एक हाती सत्ता मिळवली आहे. विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सातही जागांवर आरपीआयने गुलाल उधळला.
अचूक नियोजनाने आरपीआयचे सर्व उमेदवार विजयी
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचे पॅनल उतरवले होते. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. गायकवाड यांनी या निवडणुकीचे अचूक नियोजन केले होते. घरोघरी जाऊन प्रचार करतानाच येथील मतदारांच्या समस्याही जाणून घेण्याचे काम गायकवाड यांनी केले होते. त्यामुळे रिपाइंच्या पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे. यावेळी आरपीआयने स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का दिला.