महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मागासवर्गीय समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटवा' - pandharpur news

मागासवर्गीयांना पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे. सदर समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटवून मागासवर्गीय समाजातील मंत्र्यांची नेमणूक करण्यात यावी, अश्या मागणीसाठी राज्याचे युवक आघाडी संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

'मागासवर्गीय समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटवा'
'मागासवर्गीय समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटवा'

By

Published : Jun 7, 2021, 10:05 PM IST

पंढरपूर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी मागासवर्गीयांना पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे. सदर समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटवून मागासवर्गीय समाजातील मंत्र्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा मागणीसाठी राज्याचे युवक आघाडी संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना देण्यात आले.

याप्रसंगी आरपीआयचे नेते सुनील सर्वगोड, दीपक चंदनशिवे, संजय सावंत, मोहन ढवळे, किर्तीपाल सर्वगोड, माऊली हळणवर, सुभाष मस्के, अरविंद कांबळे, अतिश हाडमोडे, समाधान बाबर, विजय खरे, राजकुमार भोपळे, दत्ता वाघमारे, सुभाष वाघमारे, रवी भोसले, रामभाऊ गायकवाड, अक्षय वाघमारे, भारत गायकवाड, बाळासाहेब साखरे, सुभाष सातपुते, श्रीनाथ बाबर, विजय वाघमारे, आकाश बाबर आदी उपस्थित होते.

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवावे -


मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षणाला राज्य सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने संबंध राज्यभर सरकार विरोधात आक्रोश पहावयास मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून पंढरपूर येथील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटवण्याची मागणी -
मागासवर्गीय पदोन्नती समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटवून मागासवर्गीय मंत्र्यांची किंवा निवृत्त न्यायाधीश यांची नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्याचे युवक आघाडी राज्य संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी यावेळी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details