सोलापूर -माढ्यात दोन ठिकाणी दरोडे टाकून 16 तोळे सोन्यासह 4 लाखाचा माल दरोडेखोरांनी लूटला. माढ्यातील कूमार चवरे आणि मिटू वाघ यांच्या घरी बूधवारी पहाटेच्या सूमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. भर वस्तीत असलेल्या घरामध्ये दरोडा पडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. माढ्यातील कूमार चवरे आणि मिटू वाघ यांच्या घरावर बूधवारी पहाटे चारच्या सूमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरोडा टाकत असताना मुलांच्या आणि त्याच्या आईच्या गळ्याला चाकू लावून घरातील ऐवज लूटला. याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला.
माढ्यात दोन ठिकाणी दरोडा, गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा - undefined
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दोन ठिकाणी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बूधावारी पहाटेच्या सूमारास स्वेटर आणि काळी पॅट घातलेले 25 ते 30 वर्ष वयोगटातील तरूण कूमार चवरे यांच्या घरात शिरले. कूमार चवरे यांचे घर माढ्यात भरवस्तीत आहे. चवरे यांच्या घरातील सोन्याचे दागिने ठेवलेला डबा दरोडेखोरांनी लूटला आहे. दरोडेखोर लूटत असताना घरातील राधिका चवरे जाग्या झाल्या. दरोडेखोरांनी राधिका चवरे यांच्या गळ्याला चाकू लावला व आरडाओरड केल्यास जीवे मारण्यात येईल, असे सागंतिले. दरोडेखोरांनी गळ्याला चाकू लावत घरात अर्धा तास धूडगूस घालत सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम लंपास केली.
मिटू नामदेव वाघ यांच्या घरातील 2 लाख रूपये आणि दागिने दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. मिटू वाघ यांच्या घरात घूसल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील सर्व डबे खाली टाकून डब्यात काही ऐवज ठेवला आहे का हे पाहिले. घरात दरोडेखोर घूसलेले असताना बाजूच्याच घरात झोपलेल्या वाघ यांच्या पत्नीला व मूलाला घरात घूसून चोरी होत असल्याचे लक्षात देखील आले नाही. मिटू वाघ यांनी प्लॉट खरेदीसाठी पैसे आणून ठेवलेले होते. दरोडेखोरांनी याच पैशावर दरोडा टाकला. या घटनेनंतर श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून पूढील तपास माढा पोलीस करत आहेत.